कोरोनाच्या भीतीमुळे स्मशानभूमीत गळफास लावून केली आत्महत्या

कोरोनाच्या भीतीमुळे स्मशानभूमीत गळफास लावून केली आत्महत्या

एका व्यक्तीने काकडवाल गावातील स्मशानभूमीत गळफास लावून आत्महत्या केली.

  • Share this:

कल्याण, 6 जुलै : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या कोरोनाच्या भीतीमुळेच मलंगगड पट्ट्यात मत्स्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने काकडवाल गावातील स्मशानभूमीत गळफास लावून आत्महत्या केली. कोरोना विषाणूमुळे ते घाबरून गेले होते आणि त्यांनी रात्रीच्या अंधारात आपले जीवन संपवलं आहे.

कोरोनानं आता ग्रामीण भागात देखील शिरकाव करल्याने नागरिकांमध्ये गैरसमज अधिकच वाढले आहेत. कल्याण जवळील मलंगगड येथील काकडवाल गावातील एक व्यक्ती गेल्या 2 दिवसांपासून आजारी होता आणि त्या व्यक्तीने स्वतःला होमक्वारन्टाइन करून सुद्धा घेतले होते. तसंच कोरोनाची चाचणी देखील केली होती. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधीच त्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेनंतर कल्याण जवळील मलंगगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोना आजरामधून लोक बरे होत आहेत. कल्याण मधील 6 महिन्याचे बाळ असो किव्हा 104 वर्षाचे आजोबा सुद्धा बरे झाले आहेत. त्यामुळे या पुढे कोणत्याही नागरिकांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन सरपंच चैनू जाधव यांनी केलं आहे.

दरम्यान, राजधानी मुंबईनंतर आता आसपासच्या इतर शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या आटोक्या आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

Published by: Akshay Shitole
First published: July 6, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading