कल्याणमध्ये भीषण अपघात; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू ,तर दोन व्यक्ती जखमी

या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Share this:
कल्याण, 10 डिसेंबर : कल्याणमध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. महात्मा फुले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेत काल रात्री दहाच्या सुमारास कल्याण वालधुनी रस्त्यावर आय-ट्वेण्टी कारचालक गणेश दराडे आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण धुळेकर हे कारमध्ये जात होते. त्यावेळी त्यांच्या एक सहकारी विजय सोनवणे हा त्यांना रस्त्यात भेटला. गणेश दराडे यांचा फेस कंट्रोलच्या व्यवसाय आहे. विजय सोनवणे दिसल्यानंतर गणेश दराडे यांनी गाडी थांबवली. हेही वाचा - बारबालांच्या डान्ससाठी कोरोनाचे नियम पायदळी; गावकऱ्यांसमोर रात्रभर सुरू होता अश्लील प्रकार तिघेजण कारच्या मागे उभे राहून बोलत असताना मागून येणाऱ्या भरधाव कार चालकाने या तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत आय-ट्वेण्टी कार ही विजेचा खांबाला जाऊन धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात विजय सोनवणे हे जागीच ठार झाले. तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाळकृष्ण बोडेकर आणि समीर जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण हे करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: