• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भातसा नदीवरील पूल कोसळला; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत प्रवास
  • VIDEO: भातसा नदीवरील पूल कोसळला; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत प्रवास

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 07:24 AM IST | Updated On: Mar 23, 2019 07:25 AM IST

    कल्याण, 23 मार्च : कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातसा नदीवरचा जूना पूल आज मधोमध खचला. या पुलाचा एक खांब आणि बाजूचा भाग पाण्यात पडलाय. हा पूल 45 वर्ष जुना आहे. खडवलीजवळच्या वालकस आणि बेहरे या दोन गावांना जोडणारा हा पूल पडल्यामुळे दोन्ही गावांचा येण्याजाण्याचा मार्ग आता बंद झाला आहे. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी, दुचाकीस्वार याच तुटलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. आठवड्याभरापूर्वी पुलाला तडे गेले होते. दरम्यान, मच्छिमार पाण्यात जिलेटीनचे स्फोट घडवत असल्यानं पूल कोसळल्याचा दावा भातसा धरणाच्या अभियंत्यांनी केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागानं आचारसंहितेचं कारण देत सध्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading