कल्याण, 12 फेब्रुवारी : रस्त्यावर एखादं काम सुरू असताना तिथं बॅरिकेट्स लावले जातात. पण अनेकदा काही ठिकाणी या बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोऱ्या बांधलेल्या दिसतात. अशाच नायलॉन दोरीमुळे दोन मित्रांनी आपला जीव गमावला आहे. कल्याण पूर्वमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुकेश राय आणि योगेश सांगळे अशी मृतांची नावं आहेत.
कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी परिसरात राहणारे योगेश सांगळे आणि जिम्मी बाग परिसरात राहणारा मुकेश राय हे दोघे चांगले मित्र होते.योगेश हाजगताप वाडीत राहत होता. गुरुवारी (11 फेब्रुवारी) योगेशला कामावर जायचं होतं म्हणून मुकेश राय त्याला आपल्या दुचाकीवर बसवून कल्याण रेल्वे स्टेशनला निघाला. लोकल 7 नंबर प्लेटफॉर्मवर उभी होती. 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर जात असताना तिथं बॅरिकेट्सऐवजी नायलॉन दोरी लावलेली होती. हीच नायलॉन दोरी मुकेशच्या गळ्यात अडकली. त्याचा गळा कापला गेला. तो खाली पडला. यानंतर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र योगेशही गाडीच्या खाली आपटला गेला. या अपघातात दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला.
हे वाचा - जंगलातील वणवा गोठ्यात शिरला; दावणाला बांधलेल्या 3 म्हशींचा होरपळून मृत्यू
मुकेशचं 2 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. मुकेशचे भाऊ सुनील राय म्हणाले, “बॅरीकेट ऐवजी नायलॉनची दोरी लावली होती. दोरी न दिसल्याने हा प्रकार घडला. या प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे.”
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात झाला आहे. पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल पोवार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kalyan, Maharashtra