Home /News /maharashtra /

कालनिर्णयचे 45व्या वर्षात पदार्पण

कालनिर्णयचे 45व्या वर्षात पदार्पण

फक्त मराठीच नव्हे तर भारतीय माणसाच्या सांस्कृतिक जीवनावर कालनिर्णयने सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. कालनिर्णयने फक्त पंचाग आणि कॅलेंडर प्रकाशित केलेले नाहीत तर लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपयुक्त प्रकाशनेही प्रकाशित केली आहेत.

03 डिसेंबर :पूर्वी पंचांग हे सगळ्यांना समजत नसे .त्यातील ,नक्षत्रं ,भविष्य शास्त्रार्थ कळणं अवघड जात असे. आज देशातल्या 1 कोटीहून अधिक घरांमध्ये पोचलेल्या कालनिर्णयने हे पंचाग सोपं करून जनसामान्यांपर्यंत पोचवलं आहे. पंचांग आणि ज्योतिष शास्त्र सोपं करण्याचा सांस्कृतिक रिफॉर्म कालनिर्णयने भारतात केला आहे.यंदा कालनिर्णय 45व्या वर्षात पदार्पण करतं आहे. पंचाग,भविष्य, तिथी ई. दिनदर्शिकेच्या प्रमुख अंगांचा 'कालनिर्णय' दिनदर्शिकेत पुरेपूर विचार केला जातो. कालनिर्णय जगातील सर्वाधिक खपाचं प्रकाशन आहे असं ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनने स्पष्ट केलं आहे. फक्त मराठीच नव्हे तर भारतीय माणसाच्या सांस्कृतिक जीवनावर कालनिर्णयने सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. कालनिर्णयने फक्त पंचाग आणि कॅलेंडर प्रकाशित केलेले नाहीत तर लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपयुक्त प्रकाशनेही प्रकाशित केली आहेत. लोकांच्या दररोजच्या जीवनातील गरजा डोळ्यांसमोर ठेवून कालनिर्णयने स्वादिष्ट ,आरोग्य ,मोठे आणि छोटे ऑफिस ,मीडियम ,कार,मिनी,डेस्क वर्षचंद्रिका ,नोट प्लॅनर मिनी नोट प्लॅनर अशा विविध प्रकारातील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. कालनिर्णय मराठी, गुजराती ,मल्याळम,तमिळ, तेलुगू, हिंदी, पंजाबी, इंग्रजी आणि कन्नड या 9 भाषांमध्ये प्रकाशित होतं. तसंच देशातील पहिली वेबसाईट नंतर अॅप असं काळाबरोबरच 'कालनिर्णय' कायमच चालत आलं आहे. एकंदरच कालनिर्णय आता भारतीय माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
First published:

Tags: Country, India, कालनिर्णय, देश

पुढील बातम्या