मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात आज (दि.29) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदची आव्हान केले. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळला. दरम्यान या सगळ्याच आमदार कैलास पाटील यांची प्रकृतीही खालावत असल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची मुलगी आणि पुतणी आल्याने आंदोलन स्थळावरील वातावरण काही काळ भावनीक बनले होते.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील उपोषणाला बसले आहे, त्यांची मुलगी व पुतणीसोबतच व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/XyWOf3ufCF
— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2022
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषण स्थळी त्यांची मुलगी आराध्या व पुतणी राजेश्वरी ह्या आल्या त्यानंतर एक भावनिक वातावरण झाले होते. मुलगी व बापाचे नाते किती घट्ट असते हे यावेळी पाहायला मिळाले. आंदोलनातून चला असे म्हणत या दोघींनी अनेक वेळा आमदार पाटील यांचे हात ओढले त्यानंतर गळयात पडून गालावर पपी घेतली.
हे ही वाचा : कैलास पाटलांना उपोषण सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन; चर्चेनंतर पाटील म्हणाले..
कैलास पाटील यांना ग्रामीण भागातूनही अनेक महिला येऊन भेटत आहेत व डोळ्यात अश्रू आणत आंदोलन मागे घेण्यास सांगत आहेत मात्र ते आंदोलनावर ठाम आहेत.
आमदार कैलास पाटील याचं बळीराजासाठी आंदोलन
माझ्या उपोषणामुळे जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच मी उपोषण थांबवेल असेही पाटील म्हणाले. काल एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही पाटील यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यांच्या विश्वास नाही असे नाही पण प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत आहे.
हे ही वाचा : 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं बंगाल धाडीचं लॉजिक, 27 कोटीला ट्रक लागला मग 50 कोटींना..
कारण 13 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडून गेलेला प्रस्ताव काल विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. कामात अशा प्रकारची दिरंगाई होत आहे. माझ्यामुळे जर शेतकऱ्यांना एक दोन दिवस लवकर पैसे मिळणार असतील तर उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer protest, Osmanabad, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)