Home /News /maharashtra /

कडकनाथ घोटाळ्याचा कोल्हापूरमध्ये पहिला बळी, विष पिऊन तरूण शेतकऱ्याने संपवलं आयुष्य!

कडकनाथ घोटाळ्याचा कोल्हापूरमध्ये पहिला बळी, विष पिऊन तरूण शेतकऱ्याने संपवलं आयुष्य!

प्रमोद जमदाडे यानं वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत ॲग्रोकडं अडीच लाख रुपये भरले होते

कोल्हापूर, 21 जानेवारी :  कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात तरुण शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. या घोटाळ्यात फसवणूक झालेल्या  पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या प्रमोद जमदाडे या तरुण शेतकऱ्यानं विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. प्रमोद जमदाडे यानं वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत ॲग्रोकडं अडीच लाख रुपये भरले होते. त्यानं शेड आणि अन्य खर्च यासाठी अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत ॲग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळे प्रमोदचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळं तो नैराश्यातून त्यानं शनिवारी १८ जानेवारी  विषारी औषध प्राशन केलं. त्याच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.क कडकनाथ घोटाळ्यात झालेल्या फसवणुकीचा प्रमोद पहिला बळी ठरला आहे. यामुळं रयत ॲग्रो कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेत अलिबाबा चाळीस चोरींची टोळी, न केलेल्या कामांचे असे छापले दीड कोटी दरम्यान,  सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून महापालिकेची दीड कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या गटनेत्यांनी केला होता. त्या संबंधित नगरसेवकाचे नाव महापालिका प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर या मागणीला भाजप नगरसेवक विनायक विटकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप करणाऱ्या 'अलिबाबा चाळीस चोर'च्या टोळीने कथीत भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावेत. विनाकारण आरोप करू नयेत, असं आव्हानही नगरसेवक विटकर यांनी दिले. महापालिकेची शनिवारी झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. या सभेत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रभाग 4मधील कामासंदर्भात गंभीर आरोप केले होते. कोणाचंही नाव न घेता एका नगरसेवकाने आणि त्यांच्या टोळीने प्रभाग क्र. 4 मधील कामांची बिले सादर करताना मनपा अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करुन बिले तयार केली. यातून दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. या नगरसेवकाचे नाव प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक विनायक विटकर म्हणाले, शनिवारच्या सभेत झालेले आरोप चुकीचे आहेत. महापालिकेत अलिबाबा आणि चाळीस चोर यांची टोळी आहे. टोळी प्रमुखांपैकी एक जण मुरारजी पेठेत, दुसरा भवानी पेठेत, तिसरा जुनी मिल चाळ तर चौथा बुधवार पेठ भागात राहतो. मी त्यांची नावे घेणार नाही. समस्त सोलापूरकरांना त्यांची नावे माहित आहेत. मुरारजी पेठ आणि भवानी पेठेतील नगरसेवकाचे कारनामे उघड आहेत. एक जण आमच्या पक्षाचा असला तरी आम्ही बोलायला घाबरणार नाही. जुनी मिल चाळ परिसरात राहणाऱ्या नगरसेवकाने महापालिका शाळा एकजवळ बेकायदेशीर गाळे बांधले. त्याचे भाडे तेच घेतात. नवी पेठेत स्वच्छतागृह पाडून इमारत बांधली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. यांनीच महापालिकेच्या अनेक जागा हडप केल्या. बुधवार पेठेत राहणाऱ्याने तर रस्त्यावरच घर बांधले आहे. मनपा अधिकाऱ्यांवर दबाव आणून परवाने घेतले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या