मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंच्या आदरातिथ्याने के. चंद्रशेखर राव भारावले, म्हणाले, आम्ही दोघं भाऊ...

उद्धव ठाकरेंच्या आदरातिथ्याने के. चंद्रशेखर राव भारावले, म्हणाले, आम्ही दोघं भाऊ...

"मी उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचं निमंत्रण देतो. माझं त्यांनी ज्याप्रकारे प्रेमाने आदरातिथ्य केलं आहे त्याने भारावलो आहे", असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.

"मी उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचं निमंत्रण देतो. माझं त्यांनी ज्याप्रकारे प्रेमाने आदरातिथ्य केलं आहे त्याने भारावलो आहे", असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.

"मी उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचं निमंत्रण देतो. माझं त्यांनी ज्याप्रकारे प्रेमाने आदरातिथ्य केलं आहे त्याने भारावलो आहे", असं के. चंद्रशेखर राव म्हणाले.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 20 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) आज मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर राव आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री यांच्या आदरातिथ्याने भारावल्याचं वक्तव्य केलं. तसेच उद्धव ठाकरे आणि आपण भाऊ असल्याचं ते म्हणाले. "मी उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचं निमंत्रण देतो. माझं त्यांनी ज्याप्रकारे प्रेमाने आदरातिथ्य केलं आहे त्याने भारावलो आहे. त्यांनी मला प्रेमाने जेऊ घातलं. मी या प्रेमाची नक्कची परतफेड करेन", असं राव म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे "आप आते रहें", असं म्हणाले. के. चंद्रशेखर राव नेमकं म्हणाले? देशाचं राजकारण, देशाच्या विकासाची गती, देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यांनतरही देशाची काय परिस्थिती आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटून खूप प्रसन्नता वाटली. आमची दोघांची अनेक विषयांवर खूप विस्तृत अशी चर्चा झाली. अनेक विषयांवर आमची सहमती झाली आहे. पुढे देशाच्या विकासासाठी गती वाढवण्यासाठी देशातील काही पॉलिसी बदलण्याबाबत चर्चा झाली. सर्वच विषयांवर आमचं एकमत झालं आहे. पुढे एकत्र मिळून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आमचे अनेक भाऊ-बंधू आहेत. काही दिवसांनी हैदराबाद किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी एकत्र भेटू आणि चर्चा करु. आम्ही दोघं भाऊ वाटतो कारण आमच्या दोघांची 1 हजार किमीची बॉर्डर आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही खूप चांगला प्रोजक्ट तयार केला. त्या प्रोजेक्टचा तेलंगणाला खूप चांगला फायदा झाला आहे. आम्हाला पुढेही एकत्र काम करायचं आहे. अनेक विषयांवर आम्हाला काम करायचं आहे. सर्व विषयांवर आमची चर्चा झाली. (BREAKING : सूडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले) देशाच्या राजकारणावरही चर्चा झाली. आजच्या देशातील राजकारणात बदल झाला पाहिजे. देशात एक नव्या परिवर्तनाची गरज आहे. देशात परिवर्तन व्हायला आहे. देशातील तरुणांनी पुढे जायला हवं. सर्वांनी मजबूत हिंदुस्तानला बनवावं, हीच आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो यशस्वी होतो, असं मी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे या मराठा योद्धांकडून देशाला प्रेरणा मिळाली आहे. त्याच प्रेरणेतून आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला जुलूमविरोधात लढायचं आहे. गैरकृत्यांविरोधात लढायचं आहे. स्वातंत्र्यासाठी आम्हाला लढायचं आहे. एक चांगली सुरुवात आज 'वर्षा'तून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सुरु करत आहोत. आमच्या दोघांमध्ये जी बातचित केली आहे त्याचा नक्कीच आगामी काळात चांगला परिणाम बघायला मिळेल.
First published:

पुढील बातम्या