जगातील सगळ्यात कमी उंचीची मुलगी झाली 'या' पोस्टमुळे हैराण

जगातील सगळ्यात कमी उंचीची मुलगी झाली 'या' पोस्टमुळे हैराण

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती अशी नोंद झालेल्या ज्योती आमगे आणि तिच्या कुटुंबीयांना सध्या या फेसबुकवरील पोस्टमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय

  • Share this:

नागपूर,07 सप्टेंबर :आजकाल फेसबुकवर फेक पोस्टमुळे खोटी माहिती पसरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे ज्याच्याबद्दल या खोट्या पोस्ट लिहिल्या जातात त्याला प्रचंड मनस्ताप होतो. नेमका असाच अनुभव जगातल्या सगळ्यात कमी उंचीच्या नागपुरच्या ज्योती आमगेला आला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती अशी नोंद झालेल्या ज्योती आमगे आणि तिच्या कुटुंबीयांना सध्या या फेसबुकवरील  पोस्टमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. ज्योतीचं अमेरिकेतील एका युवकासोबत लग्न झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय. पण या पोस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून ज्योती आणि तिचे कुटुंबीय न झालेल्या लग्नाच्या गोष्टीमुळे त्रस्त आहेत. या व्हायरल पोस्टमुळे ज्योतीला रोज शेकडो फोन येत असून, ती प्रत्येकाला ही पोस्ट फेक असल्याचं सांगतेय. या पोस्टमुळे ज्योती आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

दरम्यान, नागपुरातील सायबर सेलच्या कार्यालयात जाऊन तिने आपली तक्रारही नोंदवली आहे.

First published: September 7, 2017, 10:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading