• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'सत्तेत न येता केवळ आरक्षणाचा मार्ग सांगा'; जयंत पाटलांची फडणवीसांना कोपरखळी

'सत्तेत न येता केवळ आरक्षणाचा मार्ग सांगा'; जयंत पाटलांची फडणवीसांना कोपरखळी

सत्तेत आल्यास अवघ्या चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देतो, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 • Share this:
  नांदेड, 27 जून: मागील काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोध पक्षात (Opposition) आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडत आहेत. सत्तेत आल्यास अवघ्या चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देतो, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही. त्यांनी केवळ मार्ग सांगावा, आम्ही आरक्षणाचा तिढा सोडवतो, अशा शब्दांत जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. नांदेड येथील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहेत. म्हणजेच सत्तेत नसल्यावर ते काहीच करणार नाहीत. हा फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी सत्तेत येण्याची आवश्यकता नाही. आम्ही सत्ता चालवण्यास सक्षम आहोत. फडणवीसांना ओबीसींचा एवढाच कळवळा असता, तर त्यांनी भुजबळांवर इतका अन्याय केला नसता. त्यांना इतके वर्ष तुरुंगात खितपत ठेवलं नसतं. शिवाय एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देऊन पक्ष सोडायला मजबूर केलं नसतं. त्यामुळे फडणवीसांचं ओबीसीसाठी सुरू असलेलं आंदोलन केवळ हस्यास्पद असल्याची विखारी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे. हेही वाचा-फडणवीसांवरील टीकेमुळे पडळकर भडकले, संजय राऊतांवर विखारी टीका महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारनं आतापर्यंत सीबीआय, ईडी आणि आरबीआयचा वापर करणं सुरू केलं आहे. आरबीआयनं सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे सुरळीत सुरू असलेल्या संस्था बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोपही जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: