मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तलवारीने केक कापून पैलवानाने साजरा केला वाढदिवस, दहशत माजवणाऱ्यावर गुन्हा दाखल

तलवारीने केक कापून पैलवानाने साजरा केला वाढदिवस, दहशत माजवणाऱ्यावर गुन्हा दाखल

हा प्रकार उघडकीस आला असून नारायणगाव पोलिसांनी पैलवान राहुल बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार उघडकीस आला असून नारायणगाव पोलिसांनी पैलवान राहुल बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार उघडकीस आला असून नारायणगाव पोलिसांनी पैलवान राहुल बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

जुन्नर, 5 मार्च : जुन्नर तालुक्यात तलवारीने केक कापून एका पैलवानाने आपला वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि आरटीआय कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून नारायणगाव पोलिसांनी पैलवान राहुल बेल्हेकरवर गुन्हा दाखल केला आहे.

स्टीलची बाक असलेली धारदार तलवार...सोबतीला डीजे वरची नाचगाणी आणि सर्वपक्षीय राजकारणी मंडळींची उपस्थिती...32 वर्ष वयाच्या पैलवानाचा राजकीय वाढदिवस नुकताच मोठा धूम धडाक्यात साजरा झाला. जुन्नर तालुक्यातील साळवाडी येथील या युवा राजकारणी पैलवानाच्या हा धुडगूस घातलेला प्रकार परिसरात चांगलाच चर्चिला गेला आणि मग शेवटी पोलिसांना त्यावर गुन्हा दाखल करावा लागला.

हा वाढदिवस साळवाडी येथील मोकळ्या जागेत साजरा झाला होता. त्याआधी गावात मोठे फ्लेक्स लावूनही दहशत वाढवली गेली होती. आरटीआय कार्यकर्त्यांच्या जोरदार पाठपुराव्या मुळे पोलिसांना या पैलवानावर दुसऱ्या दिवशी अखेर गुन्हा दाखल केला.वाढदिवस साजरा करताना तलवार या घातक हत्याराने केक कापला आणि गावांमध्ये हे घातक हत्यार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत , नंतर रचलं असं कुभांड!

यावरून अखेर पोलिसांनी या पैलवानावर गुन्हा दाखल केला आहे. यात वापरलेली तलवारही ताब्यात घेतली आहे. बेल्हेकर याच्या विरुध्द भारतीय शस्त्र कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने या कार्यक्रमाला उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. आपण तिथे नव्हतो बुवा असंच प्रत्येकजण सांगत आहे.

First published:

Tags: Birthday, Junnar, Wrestler