लढत विधानसभेची : जुन्नरच्या मतदारांचा कौल कुणाला?

लढत विधानसभेची : जुन्नरच्या मतदारांचा कौल कुणाला?

या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे इथली मतांची गणितं नक्कीच बदलली आहेत. इथे शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शेतीच्या विकासाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा असणार आहे.

  • Share this:

जुन्नर, 18 सप्टेंबर : जुन्नर हा मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीच्या पायथ्याशी आहे. या मतदारसंघावर आधी आघाडीचं वर्चस्व होतं पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत इथे मनसेचे शरद सोनवणे आमदार झाले. महाराष्ट्रातले मनसेचे एकमेव आमदार जुन्नरच्या मतदारांनी निवडून दिले.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वल्लभ बेनके निवडून आले होते.आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या आशा बुचके दुसऱ्या क्रमांकावर होत्या. आता मात्र त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. त्याचबरोबर आधी शिवसेनेत असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुरमधून खासदार झाले. मनसेचे शरद सोनवणे आता शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे इथून कोणत्या पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.

विद्यमान आमदार शरद सोनवणेंना या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्की आहे. पण त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत. या पार्श्वभूमीवर सोनवणेंची विधानसभेची लढाई खडतर असेल अशी चिन्हं आहेत. आशा बुचके जर राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील तर ही लढत दुरंगी होईल. पण त्या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या तर जुन्नरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल.

लढत विधानसभेची : नागपूर पूर्व मध्ये यंदा कोण बाजी मारणार?

या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांना आघाडी मिळाली होती. त्यामुळे इथली मतांची गणितं नक्कीच बदलली आहेत. या मतदारसंघात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शेतीच्या विकासाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा असणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत जुन्नरमधलं मतदान

शिवाजीराव आढळराव (शिवसेना) - 71 हजार 631

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 लाख 13 हजार 182

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

शरद सोनावणे, मनसे - 60 हजार 305

आशाताई बुचके, शिवसेना- 43 हजार 382

=============================================================================================

VIDEO Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा

Published by: Arti Kulkarni
First published: September 18, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading