VIDEO : किल्ले शिवनेरीवरील जीवघेणा प्रकार कॅमेरात कैद, गडावरून तरुणीचा तोल गेला आणि...

VIDEO : किल्ले शिवनेरीवरील जीवघेणा प्रकार कॅमेरात कैद, गडावरून तरुणीचा तोल गेला आणि...

जुन्नर येथील पक्षीमित्र धीरज चौरे यांच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत.

  • Share this:

जुन्नर, 13 मार्च : किल्ले शिवनेरीवर एक महिला पर्यटक मोठ्या जीवघेण्या प्रकारातून आज सकाळी वाचली आहे. जुन्नर येथील पक्षीमित्र धीरज चौरे यांच्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत.

शिवनेरीच्या पायथ्याला सकाळीच काही पक्षांचे फोटो काढण्यासाठी धीरज गेले असताना किल्लावर काही पर्यटकंचा ग्रुप अवघड वाटेने ट्रेक करत होता. ते सर्वजण किल्लाच्या डाव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या बाजूने साखळदंडाकडे जात होते. त्यादरम्यान काही पर्यटक मागे पुढे चालत असताना धीरज यांच्या कँमेरामध्ये असे निदर्शनास आले की एक महिला पर्यटक साखळदंडाकडे शाँर्टकट घेण्याच्या उद्देशाने तिने कड्यावरून जायला सुरुवात केली.

धीरज यांना अगोदर वाटले की ती प्रशिक्षित ट्रेकर आहे, म्हणून त्यांनी कँमेरा सुरू करून व्हिडीओ चित्रिकरण केले. पण जेव्हा तिचा कड्यावरून तोल गेला आणि ती घसरत खाली येऊ लागली, तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोकला चुकला. पण या तरुणीचे नशीब बलवत्तर होते म्हणून की काय ती घसरताना एका झुडपामध्ये अडकली आणि वाचली.

दरम्यान, असे जीवघेणे प्रकार जुन्नर तालुक्यात काही नवीन नाहीत. अलिकडच्या काळात असे अनेक दुर्दैवी प्रकार घडले आहेत. जी वाट आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या वाटेने जाऊ नये, अशीच प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून समोर येत आहे.

First published: March 13, 2020, 7:36 PM IST

ताज्या बातम्या