Home /News /maharashtra /

धक्कादायक! कांद्याच्या गोणीत दगड भरून विकण्याचा शेतकऱ्याचा बनाव उघडकीस

धक्कादायक! कांद्याच्या गोणीत दगड भरून विकण्याचा शेतकऱ्याचा बनाव उघडकीस

कांद्याच्या गोणीत दगड लपवून वजन वाढवण्याचा शेतकऱ्याचा बनाव उघडकीस आला आहे.

जुन्नर, 30 सप्टेंबर : एकीकडे कांद्याचे भाव वाढले असताना दुसरीकडे कांद्याच्या गोणीत दगड लपवून वजन वाढवण्याचा शेतकऱ्याचा बनाव उघडकीस आला आहे. हा प्रकार जुन्नर बाजार समितीच्या ओतूर उपबाजार समितीत कांदा लिलाव सुरू असताना निदर्शनास आल्याने व्यापारी वर्ग आणि उपस्थित शेतकरी वर्ग अचंबित झाला. कांद्याच्या सात गोण्यांमध्ये भरलेले 22 किलो दगड, पोती फोडून बाहेर काढल्यावर शेतकऱ्याचा दगडातून पैसे मिळवण्याचा निंदनीय प्रयत्न हाणून पाडण्यात आला. ओतूर परिसरातील शेतकऱ्याने हा निंदनीय प्रयत्न केला. परंतु तो उघडकीस आल्याने शेतकऱ्याने चांगल्या प्रतवारीचा माल विक्रीसाठी आणून उत्तम भाव मिळवण्यासाठी कष्ट घ्यावेत, परंतु दगड गोणीत भरून फसवणूकीचे प्रकार करू नयेत, अशी अपेक्षा बाजारात सर्वत्र व्यक्त होत होती. शेतकऱ्याने केलेला या हिडीस प्रकाराने संपूर्ण शेतकरी वर्गाला काळीमा लागता कामा नये, अशाही प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. सध्या कांद्याला 40 ते 45 रूपये किलो भाव आहे. त्यामुळे भाव वाढले असताना दगड विकून फसवणूक करण्याचा असा प्रकार केलेल्या या शेतकऱ्याला उपस्थितांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे यापुढे असा प्रकार करणार नसल्याने शेतकऱ्याने माफी मागून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे उपस्थितांनी सांगितले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या