मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तयारीला लागा! पोलीस दलात 12,500 जागांसाठी जम्बो भरती, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

तयारीला लागा! पोलीस दलात 12,500 जागांसाठी जम्बो भरती, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

 'पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल'

'पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल'

'पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल'

नागपूर, 11 जानेवारी :  महाराष्ट्र पोलीस दलात (maharashtra police bharti) 12500  जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. या मेगा भरतीतील पहिल्या 5300 लोकांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मागील तीन वर्षांपासून वारंवार घोषणा करून सुद्धा भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केले.

रस्त्याच्या बाजूलाच तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, बीडमधील खळबळजनक घटना

अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर तीन टप्प्यात भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यामध्ये सुरुवातीला 12500 जागा भरल्या जाणार आहे आणि गरज पडल्यास येत्या 4 महिन्यात 20,000 जागा भरल्या जाणार, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे  ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

पॉर्न व्हिडीओ पाहून शारीरिक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू की हत्या? प्रेयसीला अटक

तर, पहिले 12500 पदांची भरती केली जाणार आहे. त्यानंतर आणखी 5000 पदे भरण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  गृहमंत्र्यांच्या या घोषणेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं पदाची भरती होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

First published:
top videos

    Tags: Anil deshmukh, Police