मुंबई, 17 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात झाल्याचं सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. रिफायनरीविरोधात बातम्या प्रकाशीत केल्यानं त्यांची हत्या झाल्याची शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. यावर सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना शशिकांत वारिसे यांचा अपघात घडवून आणला गेल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.
विधान परिषदेत विरोधकांनी शशिकांत वारिसे प्रकरणी लेखी प्रश्न सरकारला विचारला होता. यावर लेखी उत्तरात शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची अखेर सरकारची कबुली दिलीय. सध्या या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असल्याची देखील सरकारकडून लेखी उत्तरात माहिती देण्यात आली आहे.
शशिकांत वारिसे यांचा ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाला पेट्रोल पंपासमोर एका वाहनाने धडक दिली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं निधन झालं होतं. शशिकांत वारिसे यांना पंढरीनाथ अंबेरकरने अपघात घडवून हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. रिफायनरीमध्ये आंबेरकरच्या जमिनी असल्याचा आरोपही होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri