धुळे, 12 ऑगस्ट : धुळ्यातील दैनिक 'मतदार'चे संस्थापक-संपादक, धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचा भास्कर वाघ अपहार घोटाळा खणून काढणारे ज्येष्ठ पत्रकार जगतराव उर्फ नाना सोनवणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सोनवणे यांना पत्रपंडित पां.वा. गाडगीळ पुरस्कार मिळाला होता. त्यांची अधिकारी -कर्मचारी मार्गदर्शक तसंच सेवा शर्तींविषयी लिहिलेली पुस्तकं गाजली होती. 12 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेतीन वाजता अल्पशा आजाराने धुळ्यातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
सोनदिपा पब्लिशर्सचे सर्वेसर्वा, कायद्याचे अभ्यासक अशीही त्यांची धुळ्यात ओळख होती. बुधगाव (ता. चोपडा) हे त्यांचं मूळ गाव. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर देहदानाची इच्छा प्रकट केली होती. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. बुधवारी, 13 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 वाजता देवपुरातील, एकविरा मंदिरजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Big News : नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
जिल्हा परिषदेतील नोकरीवर पाणी सोडून नानांनी 'मतदार' हे सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि वंचित समाजासाठी वाहिलेलं वृत्तपत्र सुरू केले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून काम पाहताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी आणि कर्मचारी यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी सोनादिपा प्रकाशनाची स्थापना करून कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शक ही अत्यंत गाजलेली पुस्तके निर्मित केली. राज्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, आस्थापना व न्याय संस्थेत ही पुस्तके संदर्भासाठी आजही वापरली जातात.
प्रकृती साथ देत नसतानाही ते अलिकडे कापडणे येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhule