Home /News /maharashtra /

कल्याणमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला

केतन बेटावदकर असे गंभीर जखमी पत्रकाराचे नाव आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणाऱ्या रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले

पुढे वाचा ...
कल्याण,27 नोव्हेंबर : कल्याण पश्चिमेकडील खाजगी रुग्णालयात एका २२ वर्षीय तरुणाचा आज संध्याकाळच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकानी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारावर जमावाने जीवघेणा हल्ला केला. केतन बेटावदकर असे गंभीर जखमी पत्रकाराचे नाव आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणाऱ्या रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले. यावेळी पत्रकार केतन बेटावदकर यांना संतापेल्या जमावाने हल्ला चढवत रक्तबंबाळ केले. या हल्ल्यात पत्रकार बेटावदकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयच्या परिसरात शेकडोंच्या संख्येने संतप्त जमाव उपस्थित असून या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनानी निषेध व्यक्त करीत तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.
First published:

Tags: Kalyan, Maharashtra, Mumbai, महाराष्ट्र, रूग्णालय

पुढील बातम्या