शरद पवार निर्णय बदलणार का? वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार विनंती

शरद पवार यांनी आज घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस सहआयुक्त हे पवार यांची त्यांच्या घरी जाऊन विनंती करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 10:17 AM IST

शरद पवार निर्णय बदलणार का? वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार विनंती

मुंबई, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार घराबाहेर पडल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरद पवार यांनी आज घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस सहआयुक्त पवार यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन विनंती करणार आहेत.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याआधीच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र पवारांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

शरद पवार अद्यापही ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

'ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,' असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

Loading...

VIDEO: PMC बँकेतील खातेधारकांना मोठा दिलासा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...