मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सेनेच्या 'वंचित फॅक्टर'ला शिंदे देणार जशास तसे उत्तर, मोठा नेता लागला गळाला

सेनेच्या 'वंचित फॅक्टर'ला शिंदे देणार जशास तसे उत्तर, मोठा नेता लागला गळाला

शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सेनेला उत्तर देण्याची तयारी सुरू केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 30 नोव्हेंबर : शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सेनेला उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे लवकरच कवाडे हे शिंदे गटात सामील होणार आहे.

एका बाजूला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी युतीचे संकेत दिले असून लवकरच महाराष्ट्रामध्ये चांगलं चित्र पाहायला मिळेल असं सूचक वक्तव्य केले आहे. लवकरच माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र दिसतील असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघायला मिळणार आहे.

('तुम्ही घाण, तुमच्यामुळेच 50 लोक गेली', शिंदे गटाच्या आमदाराची विखारी टीका)

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडीवर नाराज होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी खासदार जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे यांनी भेट घेतल्याने राज्यात वेगळे समीकरण पाहायला मिळणार आहे.

(उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे...; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल)

आता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे एकत्र दिसतील, असं खुद्द जोगेंद्र कवडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Marathi news