गोपीचंद पडळकरांवर टीका करताना जोगेंद्र कवाडे यांचा तोल सुटला, आक्रमक शब्दांत पलटवार

गोपीचंद पडळकरांवर टीका करताना जोगेंद्र कवाडे यांचा तोल सुटला, आक्रमक शब्दांत पलटवार

पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

  • Share this:

जळगाव, 20 डिसेंबर : 'काँग्रेसने लाचारी सोडून सत्तेला लाथ मारत सत्तेतून बाहेर पडावं,' असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे केले होते. पडळकर यांनी केलेल्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. मात्र यावेळी कवाडे यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं.

'सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला अल्पसंख्यांक समाजाविषयी पत्र लिहून मानवता जोपासली आहे. कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा,' अशा शब्दांत टीका करीत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे.

जोगेंद्र कवाडे यांची पत्रकार परिषद, जाणून घ्या ठळक मुद्दे :

- मोदी सरकारने जर शेतकऱ्यांविषयी होत असलेले अत्याचार थांबविले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे एक जानेवारीपासून आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान राज्यभरात राबवले जाईल

- काँग्रेस पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 1997 पासून युती आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलेले आहे, सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांना त्यांचा वाटा दिला आहे. राजू शेट्टी यांना मंत्रीपद दिले. शिवसेनेने बच्चू कडू यांना पद दिले. तसे काँग्रेस पक्षाकडून अद्यापही पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही. याचा आम्हाला राग नाही मात्र खंत असल्याचे कवाडे यांनी म्हटलं आहे.

- आगामी होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी स्वबळावर निवडणुका लढविणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 20, 2020, 4:57 PM IST

ताज्या बातम्या