मुंबई, 07 जानेवारी : JNU हिंसाचार प्रकरणी निषेध करण्यासाठी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनातील विद्यार्थांना तिथून हटवण्यात आल्यानंतर आझाद मैदानात सुरू होतं. पण आता हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. आंदोलन मागे घेतलं असलं तरी लढा सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. गेटवे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी आझाद मैदानात जाऊन प्रदर्शन करण्यास सांगण्यात आलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या गाईड लाइननुसार गेट वे ऑफ इंडियावर प्रदर्शन करता येणार नाही. तसेच सोमवारी काढण्यात आलेल्या हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया रॅलीमुळे वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडला होता.
विद्यार्थ्यांना आझाद मैदानात जाण्यास सांगण्यात आले पण ते गेटवे सोडण्यास तयार नव्हते. तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं की, त्यांच्या आंदोलनाला कोणताही आक्षेप नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. देशविरोधी फ्री काश्मीरचे फलक झळकावले तरीही त्याविरुद्ध कारवाई होणार नाही पण गेट वे ऑफ इंडियापासून हटून आझाद मैदानात आंदोलन करण्याबाबत पोलिसांनी सांगितलं.डीसीपी संग्राम सिंग निशान्दर यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही आणि अटकही करण्यात आलेली नाही. तसंच त्यांना आझाद मैदानात घेऊन जात आहे.
विद्यार्थ्यांनी FREE KASHMIRचे पोस्टरचे पोस्टर्स आंदोलनावेळी झळकविल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय. मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर ही प्रदर्शने होत आहेत. हे कसं खपवून घेतलं जातंय असाल सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.
VIDEO : JNU हिंसाचार: मुंबईतल्या निदर्शनांमध्ये झळकले FREE KASHMIRचे पोस्टर
राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री पुन्हा एकदा तुफान राडा झाला. त्याचे पडसाद पुण्यासह मुंबईतही पाहायला मिळाले. विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी 'नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे'च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत.
'मोदी-शहांना जे हवे तेच घडताना दिसत आहे, देश संकटात आहे'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.