शरद पवारांपासून रितेश देशमुखपर्यंत...महाराष्ट्रातून JNU हल्ल्याचा जोरदार निषेध

शरद पवारांपासून रितेश देशमुखपर्यंत...महाराष्ट्रातून JNU हल्ल्याचा जोरदार निषेध

जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जानेवारी : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP)केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप आहे. जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे.

'जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर भ्याड आणि नियोजित हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या या कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. हिंसेचा वापर करून लोकशाही मूल्ये आणि विचार दाबण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही,' असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे, अभिनेता रितेश देशमुख यानेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'आपल्याला आपला चेहरा झाकण्याची गरज का आहे? कारण आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करत आहोत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यी आणि शिक्षकांवर मुखवटा घातलेल्या गुंडांनी क्रूरपणे हल्ला केल्याची दृश्य भयंकर आहेत. अशा प्रकारची हिंसाचार सहन केली जाऊ शकत नाही,' असं म्हणत रितेश देशमुख याने आपला संताप व्यक्त केला आहे.

JNUमध्ये नेमकं काय घडलं?

जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (ABVP) मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. JNUच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी सांगितले.

Published by: Akshay Shitole
First published: January 6, 2020, 7:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading