सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन दिलीप वळसे पाटील यांची अखेर उचलबांगडी

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन दिलीप वळसे पाटील यांची अखेर उचलबांगडी

सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:

सोलापूर, 31 मार्च: सोलापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा जिल्ह्याचा दौरा केला होता. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नवा पालकमंत्री नेमण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा.. कोरोनामुळे पतीची छुपी बँकॉक ट्रिप झाली उघड, अचानक पोलीस घरी आल्याने पत्नी हैराण

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 'लॉकडाऊन'च्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनावर पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही, अशी टीका विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात होत होती. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा..क्वारंटाईनमध्ये लेकीकडून मेकअप टिप्स घेतेय गौरी खान, Photo शेअर करुन म्हणाली...

दरम्यान, लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. महापालिका, रुग्णालये, अत्यावश्यक वस्तूची सेवा देणारी दुकाने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत. पण कुणाचा कुणाला ताळमेळ दिसत नाही. दूध विक्री करणाऱ्या माणसाला रस्त्यावर अडवले जात आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्याला हुसकावून लावले जाते. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना पेट्रोल दिले जात नाही. मेडिकलच्या इर्मजन्सीसाठी जाणाऱ्या लोकांना पेट्राल दिले जात नाही, अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी सोलापुरात असणे आवश्यक असल्याचं नगरसेविका  फुलारे यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 04:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading