Home /News /maharashtra /

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भाजपची तक्रार

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भाजपची तक्रार

पंढरपूरातील चैत्र एकादशी महापूजा प्रकरणानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण रंगणार असं दिसत आहे.

पंढरपूर, 8 एप्रिल : ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा आरोप केल्यानंतर आधीच चर्चेत असलेले गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी 3 एप्रिल रोजी विठ्ठल मंदिरात न जाता संत चोखामेळा यांचे दर्शन घेतले होते व त्यांचा जातिवाचक उल्लेख केला होता. भाजप माजी उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी पोलीस ठाण्यात संत चोखामेळा यांचा जातीवाचक उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे. पंढरपूरातील चैत्र एकादशी महापूजा प्रकरणानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण रंगणार असं दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाणीचा आरोप 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली,' अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. मारहाण प्रकणावर आव्हाड यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केलीये अशी तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला. संपादन- अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: BJP, Jitendra awhad, Solapur news

पुढील बातम्या