मुंबई, 07 डिसेंबर : वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट मागच्या काही दिवसांपासून कोणत्या कोणत्या कारणावरून चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. नुकतंच या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय... ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातयं असं वाटतं. pic.twitter.com/tXtCmOnqNN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2022
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे अनेकांना धक्का बसला होता. अक्षय ही भूमिका साकारणार असल्याचं कळताच अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. त्यानंतर आता त्याचा लूक समोर आल्यानंतरही त्याला टीकेला सामोरी जावं लागत आहे.
हेही वाचा -Swara Bhasker: स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये मिळत नाहीये काम; स्वतःच सांगितलं कारण
काय म्हणाले आव्हाड, बल्ब चा शोध कधी लागला..काय थट्टा लावली आहे … मराठी माणसाला येड्यात काढता आहेत. जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय... ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढलं जातयं असं वाटतं.
हे ही वाचा : शाहरुख खानचा लेक अखेर वडिलांचं 'हे' स्वप्न पूर्ण करणार; फोटो शेअर करत म्हणाला...
दरम्यान ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. तर संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर महेश मांजरेकरांचा मुलगा सत्य मांजरेकर, बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Mumbai