मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवारांच्या एण्ट्रीला 'अज़ीम-ओ-शान शहेंशाह', भाजपच्या टीकेवर आव्हाडांचा पलटवार

पवारांच्या एण्ट्रीला 'अज़ीम-ओ-शान शहेंशाह', भाजपच्या टीकेवर आव्हाडांचा पलटवार

शहंशाह गाण्यावरून भाजपची शरद पवारांवर टीका

शहंशाह गाण्यावरून भाजपची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय संमेलन (NCP) नवी दिल्लीमध्ये पार पाडलं. या संमेलनात शरद पवारांच्या (Sharad Pawar) एण्ट्रीला जोधा अकबर (Jodha Akbar) या चित्रपटातलं अज़ीम-ओ-शान शहेंशाह हे गाणं वाजवलं गेलं. या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय संमेलन (NCP) नवी दिल्लीमध्ये पार पाडलं. या संमेलनात शरद पवारांच्या (Sharad Pawar) एण्ट्रीला जोधा अकबर (Jodha Akbar) या चित्रपटातलं अज़ीम-ओ-शान शहेंशाह हे गाणं वाजवलं गेलं. या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला. भाजपच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पलटवार केला आहे.

'आपण इतिहास पाहिला तर श्रीकृष्णावरती सगळ्यात जास्त गाणी जर कोणी लिहिली असती तर ती उर्दूमध्ये लिहिण्यात आली आहेत. गाण्यावरून जात धर्म ही नवीन समीकरणं कुठून येत आहेत? म्हणजे आता गाणं लावलं की त्यातूनही जात निघणार आहे का? त्यातील शब्दरचना म्हणजे एखाद्याची वाहवा असते. तुम्ही या गाण्याची तुलना कशाशीही कराल, याला काही अर्थ नाही,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

भाजपची टीका

"मरहबा जनाब शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह. फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?", अशी खोचक टीका भाजपच्या ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील ट्विटरवर संबंधित व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह..", अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

First published:

Tags: BJP, Jitendra awhad, NCP, Sharad pawar अध्यक्ष