मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जितेंद्र आव्हाड- देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट, चर्चेला उधाण

जितेंद्र आव्हाड- देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट, चर्चेला उधाण

सध्या राजकारणात भेटीगाठींना फार महत्त्व आलं आहे.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची गुप्त भेट ( Secret Meeting)घेतली आहे.

मुंबई, 24 जून: सध्या राजकारणात भेटीगाठींना फार महत्त्व आलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची गुप्त भेट (Secret Meeting) घेतली आहे. या दोघाची भेट आता चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. तसंच या भेटीमुळे राजकीय चर्चेलाही उधाण आलं आहे. कर्करोग रुग्णांच्या नातेवाईंकाना देण्यात आलेल्या घरांचे ठिकाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बदलल्यानंतर जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत.

दरम्यान आव्हाडांनी फडणवीस यांची घेतलेल्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना नसल्याचंही समजतंय. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली आहे. या भेटीदरम्यान आव्हाड जवळपास दोन तास नॉट रिचेबल होते.

हेही वाचा- सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा लागू होणार कठोर निर्बंध?

शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना महत्त्व दिल्यामुळे जितेंद्र आव्हाड नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. त्यानंतर आव्हाडांची नाराजी ओळखू मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ पर्यायी जागेचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची नाराजी दूर करण्यासाठी पत्राचाळीचा निर्णय घेतला. मात्र असं असतानाही आव्हाडांनी फडणवीसांची भेट घेतली. मात्र दोघांच्या भेटीचं नेमकं कारण काय होतं? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Jitendra awhad