Home /News /maharashtra /

'मी वक्तव्य बदलणारा माणूस नाही' ओबीसी विधानावर जितेंद्र आव्हाड ठाम

'मी वक्तव्य बदलणारा माणूस नाही' ओबीसी विधानावर जितेंद्र आव्हाड ठाम

'सध्याचं राजकारण हे घाणेरडं झालं आहे. काहीही झालं तरी माझ्या घरावर मोर्चे काढतात. माझी मुलगी घाबरते'

'सध्याचं राजकारण हे घाणेरडं झालं आहे. काहीही झालं तरी माझ्या घरावर मोर्चे काढतात. माझी मुलगी घाबरते'

'सध्याचं राजकारण हे घाणेरडं झालं आहे. काहीही झालं तरी माझ्या घरावर मोर्चे काढतात. माझी मुलगी घाबरते'

पुणे, 09 जानेवारी :  'ओबीसींवर (obc) माझा विश्वास नाही या विधानावर मी आजही ठाम आहे. मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, मी माझं वक्तव्य बदलणारा माणूस नाही, मी जे बोलतो ते  माझ्या हदयापासून असते, पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माघार घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ओबीसींवर माझा विश्वास नाही, असं विधान केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने जोरदार निर्दशनं केली होती. त्यानंतर आज पुण्यात राज्यस्तरीय वंजारी समाजाच्या मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित आहे. यावेळी बोलत असताना आव्हाड यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. 'मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, मी माझं वक्तव्य बदलणारा माणूस नाही, मी जे बोलतो ते  माझ्या ह्रदयापासून असते, पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही' असं म्हणत आव्हाड यांनी ओबीसी विधानावर आपण ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितलं. ('आम्हाला कुणी विचारत नाही' सेनेच्या आमदाराचा सरकारला घरचा अहेर) 'सध्याचं राजकारण हे घाणेरडं झालं आहे. काहीही झालं तरी माझ्या घरावर मोर्चे काढतात. माझी मुलगी घाबरते. यापूर्वी ही राजकारण झालं गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष सगळ्यांनी पहिला मात्र आताची ज्या परिस्थित राजकारण केलं जातं ते घाणेरडं आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी भाजपवर केली. 'मी दुसऱ्यांदा जातीच्या कार्यक्रमाला आलोय. मी पहिल्यापासून बहुजनांचे विचार मांडत आलो आहे, मागे पुरंदरेंच्या वेळी महाराष्ट्र भर फिरलो. मी जे बोललो त्यावरून मोठा गदारोळ झाला मी असं काय बोललो होतो. अर्धे मंडल आणि अर्धे कमंडल, काय चुकीचे बोललो. जे बोललो त्यावर ठाम आहे, पथर की लकीर आहे, आता झालेल्या तहसीलदारांना सांगितलं आता आरक्षण रद्द झालं तुम्ही कलेक्टर व्हायच स्वप्न सोडून द्या. आमच्या नंतर आलेल्या मराठा समाजाने मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. नाशिकमधल्या सगळ्यात मोठ्या जागेवर आम्ही काय केलं सर्कस लावली तमाशाचे फड चालवले, आयएएस अधिकारी होतात, नंतर ते कायद्याच्या पुस्तकात अडकून जातात. काम करण्याऐवजी अडकवण्याचा वापर करतात, असंही आव्हाड म्हणाले. (गारा हातात घेऊन सुन्न होऊन पाहत राहिला बळीराजा; दृश्य पाहून हृदय पिळवटून निघेल) कुणी मी मुसलमानांची दलाली करतो म्हणतात, आता म्हणतात जास्त ख्रिश्चन समाजाची दलाली करायला लागला, कारण जावई आहे. आता उत्तर भारतात संता जाळले, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. काय म्हणाले होते आव्हाड? मला 'ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. कारण मंडळ आयोग आला होता, ते ओबीसी समाजासाठी होते. पण आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा obc मैदानात लढायला नव्हते, लढायला महार आणि दलित होते कारण ओबीसींना लढायचंच नव्हतं आणि लढायचं सुद्धा नव्हतं ओबीसींवर ब्राम्हण वादाचा इतका बडगा बसला आहे की आपण श्रेष्ठ आहोत असा समाज झाला आहे, पण त्यांना माहित नाही आपल्या पूर्वजांना देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही आणि हे सगळे विसरले आहे, असं आव्हाड म्हणाले. तसंच, आता ओबीसी आरक्षणासाठी पुढे येत आहे, पण घरात बसून आणि व्हॉट्सअॅप करून आरक्षण मिळणार नाही तर सरकारशी दोन हात करावे लागतील. आज जर ५० टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रात हे राज्य पुढे जाऊ शकणार नाही हे लक्षात घ्यावे लागेल. भूमिपूत्रांचा वेगळा पगडा असतो. पण लढायचं नाही, असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी" असंही आव्हाड म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या