जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात, स्वत:ला करून घेतलं होम क्वारन्टाइन

जितेंद्र आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात, स्वत:ला करून घेतलं होम क्वारन्टाइन

जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे.

  • Share this:

विनया देशपांडे, मुंबई, 13 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad home quarantine) यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.

ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर शासन आणि प्रशासनातील लोक रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. गृहनिर्माण मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड हेदेखील आपला मतदारसंघ असलेल्या कळवा आणि मुंब्र्यात रस्त्यावर उतरून लॉकडाऊनच्या स्थितीचा वारंवार आढावा घेत होते. त्यावेळी त्यांच्या एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आला जो आता कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे, अशी माहिती आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करू घेतल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं. त्यावर ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 13, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या