कुडाची झोपडी, तांदळाची भाकरी, भाजलेला कोंबड्याच्या रस्सा, कनटोरल्याची भाजी आणि शरद पवार! आता हा PHOTO VIRAL

कुडाची झोपडी, तांदळाची भाकरी, भाजलेला कोंबड्याच्या रस्सा, कनटोरल्याची भाजी आणि शरद पवार! आता हा PHOTO VIRAL

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

शहापूर, 01 फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदिवसी पाड्यांवर भेट देऊन जेवत असल्याचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केले आहेत. शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी शहापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी कर्करोग असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचं भूमीपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. भूमीपूजनानंतर पवारांनी आदिवासी पाड्याला भेट दिली. यावेळी दुपारच्या जेवणाचा आस्वाद त्यांनी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी घेतला. अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय आदिवसी पाड्यांना विशेष भेट देतात. तिथल्या लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि असलेल्या सुविधांचा अभाव याचा आढावा ते वेळोवेळी घेत असतात.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. 'या नेत्याला काय म्हणावे, कुडाची झोपडी...आदिवासी मावशीने केलेला स्वयंपाक, तांदळाची भाकरी, भाजलेला कोंबड्याचा रस्सा आणि कनटोरल्याची भाजी आणि साहेब जेवता आहेत. संस्मरणीय दिवस.' असं लिहून जितेंद्र आव्हाड भावुक झाल्याचं पाहायला मिळात आहे. आदिवासी पाड्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या समस्या पोटतिडकीनं शरद पवार वेळोवेळी जाणून घेत असतात. शहापूर इथे ग्रामीण भागात कर्करोगाची वाढती संख्या, मुलांचं आरोग्य यासगळ्याचा विचार करता नव्यानं उभारण्यात य़ेणारं रुग्णालय आदिवासी पाडे आणि ग्रामस्थांना वरदान ठरेल अशी आशा यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली आहे. दोऱ्याचा पाडा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'कामावर जा आणि पैसे कमव', 75 वर्षांच्या आईला मुलांनी काढले घराबाहेर

First published: February 1, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या