Home /News /maharashtra /

VIDEO : इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा केला होता प्रयत्न -जितेंद्र आव्हाड

VIDEO : इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा केला होता प्रयत्न -जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांबाबत वादग्रस्त विधानं सुरूच आहे

  बीड, 29 जानेवारी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. बीड शहरातील संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांबाबत वादग्रस्त विधानं सुरूच आहेत. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. मग त्यानंतर करीम लाला इंदिरा गांधींना भेटायचा असं संजय राऊत म्हणाले.आणि आता आव्हाडांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय.
  बीडमध्ये आज संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना, इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणी बोलण्यास तयार नव्हतं, पण अहमदाबाद आणि पाटणाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरू झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल. यांचे श्रेय जेंएनयू, हैद्राबाद युनिवर्सिटीला द्यावा लागेल, असं आव्हाड म्हणाले. तसंच, विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगतं आवज देत आहेत, आज संख्या कमी दिसत आहे. हळू हळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आजादी मिळवून देतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. पुढे बोलतांना तें म्हणाले की, देशात मोदी शहा हे जेएनयू ला घाबरतात, कारण सळसळते रक्त आणि बुद्धीमान लोकांना हे सरकार घाबरते म्हणून ते नेस्ट नाबूत करण्यासाठी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला पण जेव्हा विद्यार्थी आणि महिला आंदोलनात सहभागी होतात. तेव्हा होणारी क्रांती कोणीच रोखू शकत नाही. इंदिरा गांधीचा पराभव देखील याचं विद्यार्थ्यांनी केला होता. हा देशाचा इतिहास आहे, असंही ते म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Beed, Indira gandhi, Jitendra awhad, NCP

  पुढील बातम्या