कोरोनाच्या लढ्यासाठी ‘केवळ महिन्याचा नाही, माझा संपूर्ण वर्षाचा पगार घ्या’ जितेंद्र आव्हाडांची घोषणा

कोरोनाच्या लढ्यासाठी ‘केवळ महिन्याचा नाही, माझा संपूर्ण वर्षाचा पगार घ्या’ जितेंद्र आव्हाडांची घोषणा

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीत मदतीचा ओघ सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) लढ्याविरोधात लढण्यासाठी उद्योगपती, अभिनेत्यांपासून अगदी सर्वसामान्यही मदतीला धावून आले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही (Jitendra Avhad) मदतीसाठी पुढे आले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. केवळ महिन्याचा नको तर या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

यापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार-खासदार यांनी एक महिन्याचा पगार राज्य सरकारन देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. माझा या वर्षीचा पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा अशी घोषणा आव्हाडांनी केली आहे.

संबंधित - कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंनीही दिली देणगी

कोरोनाच्या लढाईसाठी देशभरातून मोठी मदत सुरू आहे. अगदी उद्योगपती, अभिनेते, खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. नाम फाऊंडेशन यांच्यावतीने काल नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधी आणि पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले असून कोरोनाच्या लढाईत हातभार लावत आहेत.

संबंधित - PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत

First published: March 31, 2020, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading