विखे-पाटील यांच्याबाबत जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

विखे-पाटील यांच्याबाबत जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

राधाकृष्ण विखे - पाटील शरद पवार वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : विखे पाटील-पवार वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ''बाळासाहेब विखे- पाटील यांचा पराभव करायला राजीव गांधी यांनी सांगितलं होतं. केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांनी ती जबाबदारी पार पाडली'', असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 'राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पक्ष निष्ठा शिकवू नये. भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांनी आघाडी धर्म शिकवू नये', असा टोला देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विखे-पाटलांना लगावला. मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर देखील नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. परिणामी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीमध्ये आता वाद पाहायला मिळत आहे.

नगरमध्ये सुजयचा किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही- विखे पाटील

पत्रकार परिषदेत काय म्हणाले विखे?

दरम्यान, राधाकृष्ण विखे - पाटील आता राजीनामा देणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे नगरची जागा मागितली होती. कारण, जास्त जागा जिंकाव्यात हेच यामागील गणित होतं, आम्ही आघाडीची धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिलाय, असं म्हणणं चुकीचं आहे. शरद पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी असून जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहबे. पवारांनी अशा प्रकारे टिप्पणी करायला नको होती. मुलानं केलेल्या भाजप प्रवेशावर मी उत्तर हायकमांडला देईन.तसेच अहमदनगरमध्ये मी कुणाच्याही प्रचाराला जाणार नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. सुजयचा भाजप प्रवेशाचा निर्णय वैयक्तिक होता. अशा शब्दात विखे - पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सुजय पासून ते शरद पवारांपर्यंत काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? UNCUT पत्रकार परिषद

First published: March 14, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading