मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुमच्या भविष्यासाठी हात दाखवता अन् लोकांचं भविष्य....आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

तुमच्या भविष्यासाठी हात दाखवता अन् लोकांचं भविष्य....आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या भविष्याकरता हात दाखवता आणि दुसऱ्यांचे भविष्य खराब करण्याकरता चाल चालता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. तसेच यावेळी बोलताना  लवकरच माझ्यावर सीबीआयची चौकशी बसवली जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आव्हाड यांनी नेमकं काय म्हटलं? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपलं भविष्य पहाण्यासाठी ज्योतिषाकडे गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मी 30 जूनलाच हात दाखवला असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. आता या वादात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

हेही वाचा :  '...तर कर्नाटकची विधानसभाच बरखास्त केली असती, बोम्मईंची भाषा पाकिस्तानची,' ठाकरे गटाचा पुन्हा हल्ला

मुख्यमंत्र्यांवर निशाणा  

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तुमच्या भविष्याकरता हात दाखवता आणि दुसऱ्यांचे भविष्य खराब करण्याकरता चाल चालता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की,  लवकरच माझ्यावरही सीबीआयची चौकशी बसवली जाईल. मी आणि माझ्या परीवाराने मानसिकता तयारी केली आहे असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  उद्धव ठाकरेंची तोफ बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार! राज्यपालांविरोधात उद्याच 'महाराष्ट्र बंद'ची हाक?

विरोधकांचा नेमका आरोप काय? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हात दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मी तीस जूनलाच हात दाखवला. आत्मविश्वास होते म्हणून इतके आमदार माझ्यासोबत आले असं म्हटलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Jitendra awhad, NCP, Sharad Pawar