मुंबई, 29 सप्टेंबर- शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी नवा वाद निर्माण केलाय. अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भारतानं जगाला बुद्ध दिल्याचं सांगितलं. तर बुद्ध उपयोगाचा नाही, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. काँग्रेसनं यावरून टीका केली आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर संभाजी भिडे यांना डॉक्टरांना दाखवण्याची गरज असल्याचं विधान केलं.