'बॉडी बिल्डरां'नो सावधान, जीमच्या सप्लिमेंट्समध्ये आहेत नशेची औषधं?

'बॉडी बिल्डरां'नो सावधान, जीमच्या सप्लिमेंट्समध्ये आहेत नशेची औषधं?

'व्यायाम करा पण अघोरी आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करण्याऐवजी पारंपारिक व्यायामाने अंगमेहनतीने तब्येत कमावण्याची गरज आहे.'

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे 9 जुलै : कमी वेळात जास्त वेगात बॉडी बनवण्याची तरुणांमध्ये क्रेश असते. त्यासाठी तरुण वाट्टेल ते करायला तयार असतात. तरुणांच्या या वेडाचा फायदा घेऊन त्यांना 'अॅडिक्ट' बनवलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलंय. मसल्स बनवण्यासाठी, शरीर पिळदार दिसण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात जी औषधं वापरली जातात ती औषधं बेकायदेशीरपणे तरुणांना विकली जात असल्याचं पुढं आलंय. अव्वाच्या सव्वा किंमतीच्या दरात ही औषधं विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही दिवस शारीरिक क्षमतेत वाढ झालेली दिसत असली तरी या औषधांचे साईड इफेक्ट खूप घातक असल्याने हे तरुण नशेच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे़.

'राज ठाकरे काँग्रेससोबत गेले तर मनसेचं मोठं नुकसान'

औषधांपासून सावधान

सिनेमा आणि सिरीयल्स मधल्या नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स पॅकचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत़. त्यांना तातडीने रिझल्ट दाखविण्यासाठी काही प्रशिक्षकच मसलची ताकद वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे औषधे पुरवित असल्याचं आढळून आलंय.

पोलिसांनी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे कोणताही परवाना नसताना या औषधांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केलीय. या सर्वांना अन्न व औषध प्रशासनाकडे दिली असून त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी योगेश किसन मोरे (दत्तप्रसाद बिल्डिंग, मुंकुदनगर), अशिष गोपाळ पाटील (पिंपरी), सुरेश चौधरी (गंगा सॅटेलाईट, वानवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याकडून तब्बल 1 लाख 82 हजार 176 रुपयांची औषधे जप्त करण्यात आल्याची माहिती स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कदम यांनी दिलीय.

आऊट गोईंग सुरूच, राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

घाई जीव घेईल

ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, औषधाचा मुळ गुणधर्म माहिती नसताना जिममध्ये व इतर ग्राहकांना सर्रास  विक्री केली जाते. या औषधामुळे ग्राहकांच्या आरोग्या, जिवितास हानी होण्याची शक्यता आहे. मेफेथेरमाइन सल्फेट इंजेक्शन या औषधाचा उपयोग लो ब्लड प्रेशर मध्ये केला जातो. या औषधाच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक किंवा आयात परवाना क्रमांक नमूदही करण्यात आलेला नाही.

व्यायाम करा पण अघोरी आणि बेकायदेशीर औषधांचा वापर करण्याऐवजी पारंपारिक व्यायामाने अंगमेहनतीने तब्येत कमावण्याची गरज आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे शरीर कमविताना ते नैसर्गिकपणे मिळवलेलं असावं असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

First published: July 9, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading