'सावरकर हे ब्रिटिशधार्जिणे आणि माफीवीर', पुण्यातल्या कार्यक्रमात जिग्नेश मेवाणींची टीका

'सावरकर हे ब्रिटिशधार्जिणे आणि माफीवीर', पुण्यातल्या कार्यक्रमात जिग्नेश मेवाणींची टीका

गांधींजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मुक्ताफळं उधळली.

  • Share this:

पुणे, 30 जानेवारी : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मुक्ताफळं उधळली. सावरकर हे ब्रिटिश सरकारधार्जिणे आणि माफीवीर होते, असं जिग्नेश मेवाणी म्हणाले.

भाजप वि. 130 कोटी

दिल्लीतल्या शाहीनबागमध्ये झालेल्या गोळीबारावरूनही जिग्नेश मेवाणी यांनी सरकारला धारेवर धरलं. गांधी पुण्यतिथीच्या दिवशीच दिल्लीत आणखी एक गोडसे तयार होतोय, अशी टीका त्यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीतलं शाहिनबागचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, असंही ते म्हणाले. मी गुजरातचा असलो तरी गुजराथी लोकांसोबत नाही पण तुमच्यासोबत आहे, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. या लढाईत भारतीय म्हणून उतरलो तरच जिंकू, असंही त्यांनी सांगितलं. ही लढाई भाजप विरुद्ध 130 कोटी भारतीयांची आहे, असं ते म्हणाले.

(हेही वाचा : 'चेतक' ला गती देणारे राहुल बजाज आता नाहीत सूत्रधार, बोर्डाने केला मोठा बदल)

पुण्यातल्या आणखी एका कार्यक्रमात अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही भाषण केलं. गांधीजींना मुस्लीम, शीख किंवा ख्रिश्चन नाही तर हिंदू इसमानेच मारलं, याची आठवण त्यांनी करून दिली. सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लीमविरोधी आणि गरिबांच्या विरोधातही आहे, असं त्या म्हणाल्या. लोकशाही म्हणजे नेता नाही,संसद नाही तर या देशातले लोक आहेत. आधी आपली लढाई इंग्रजांच्या विरोधात होती. आता आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आहे,असंही त्या म्हणाल्या. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ऊर्मिला मातोंडकर यांनी हे मत मांडलं.

==============================================================================

First published: January 30, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या