शरद पवार झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जाणार नाहीत, कारण...

शपथविधीला देशातील इतर महत्त्वाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 29 डिसेंबर : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेने हे आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला देशातील इतर महत्त्वाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र शरद पवार या शपथविधी सोहळ्यला उपस्थिती लावू शकणार नाहीत.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर उद्या या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात नियोजित कार्यक्रम घेण्यात येणार असल्याने शरद पवार हे आज होणाऱ्या हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

झारखंडची निवडणूक आणि पवारांची प्रेरणा

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपची धूळधाण उडाली आणि झारखंड मुक्ती मोर्चाबरोबर आघाडी असणाऱ्या काँग्रेसची सरशी झाली. झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन शपथ घेणार आहेत. झारखंडमधल्या निवडणुकीच्या लढतीला महाराष्ट्रातल्या शरद पवार यांच्या लढ्याने प्रेरणा मिळाली, असं हेमंत सोरेन यांची जाहीरपणे सांगितलं आहे.

'वाईट नेत्याला साथ देणे महाराष्ट्राची चूक', अमृता फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या यशाचं प्रेरणास्थान शरद पवार असल्याचं Twitter वरच्या पोस्टमध्ये सांगितलं. शरद पवार यांनी झामुमोच्या सोरेन यांचं अभिनंदन करणारी पोस्ट लिहिल्यानंतर त्याचं उत्तर देताना सोरेन यांनी लिहिलं आहे की, 'धन्यवाद शरद पवारजी. तुमच्या महाराष्ट्रातला लढा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होता.'

भाजपचा उडाला धुव्वा

भारतीय जनता पक्षाला झारखंडमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या युतीने भाजपला मागे टाकलं आहे. त्यामुळे झारखंड हेही भाजपच्या हातातून गेलं. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांपाठोपाठ हे राज्यही भाजपच्या हातातून निसटल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

निम्म्या भागात गेली सत्ता

डिसेंबर 2017 चं चित्र पाहिलं तर देशभरात 71 टक्के भागात भाजपची सत्ता होती. झारखंडच्या निवडणूक निकालानंतर डिसेंबर 2019 चं चित्र पाहिलं तर फक्त 35 टक्के भागात भाजपची सत्ता आहे. 2017 मध्ये भाजपशासित राज्यांमध्ये 68 टक्के लोकसंख्या होती. म्हणजेच देशाची जेवढी लोकसंख्या होती तेवढ्या टक्केवारीच्या भागात भाजपचं राज्य होतं. आता 2019 मध्ये भाजपच्या हातात देशाची 43 टक्के लोकसंख्या राहील. 2014 मध्ये भाजपकडे 7 राज्यं होती. 2018 मध्ये या राज्यांची संख्या 19 झाली. म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्षांची 19 राज्यांत सत्ता आहे.

First Published: Dec 29, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading