सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 7 लाखांना लुटणाऱ्या घटनेला धक्कादायक वळण

सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 7 लाखांना लुटणाऱ्या घटनेला धक्कादायक वळण

बेदम मारहाण करत त्यांच्याकडील 400 सोन्याचे दागिने आणि 2 किलो चांदीच्या वस्तू घेवून पसार झाले होते.

  • Share this:

 

शिर्डी, 28 जानेवारी : चोरट्यांना हाताशी धरून सोनारानेच सोनाराला लुटल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यात 21 तारखेला सोनाराच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून मारहाण करत लाखो रूपयांच्या सोन्याची लूट करण्यात आली होती. या घटनेमागील सुत्रधार एक सोनारच असल्याचं समोर आलं आहे.

नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील निखिल आंबीलविदे हे आपल्या दुकानातून घरी जात होते. पानेगाव शिरेगाव रस्त्यावर मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी गाडी आडवी लावून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनाराच्या डोळ्यात मिरची पुड टाकली आणि बेदम मारहाण करत त्यांच्याकडील 400 सोन्याचे दागिने आणि 2 किलो चांदीच्या वस्तू घेवून पसार झाले होते.

त्यांच्याकडून एकूण 7 लाख 90 हजार 778 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटले होते.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत यातील चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान आया आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली. या ‘लुटी’ ची सुपारी कोल्हार भगवती गावातील सराफ विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर यानेच दिली होती. त्यासाठी त्याने श्रीरामपूरच्या ‘लुटारू’ गँगला हाताशी धरून या कृत्याला अंजाम दिला. यातील चौघांना गजाआड करण्यात आले असून अन्य संबंधित सराफासह पाचजण पसार झाले आहे.

सोनसाखळी चोरीची नऊ दिवसांनी तक्रार

दरम्यान, अहमदनगर शहरात सोन साखळी चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. नगरमध्ये एका चालकाला रात्री लिफ्टच्या बहाण्याने गाडी थांबून लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला. या घटनेनंतर चालकांनी तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. अखेर ल नऊ दिवसांनी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये चोऱ्या आणि लुटीचा प्रमाणात वाढल्याने या गोष्टींना आळा घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. गाडी चालक वैभव पवार यांची अखेर मंगळवारी पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे. तब्बल नऊ दिवस पोलिसांनीही फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे.

First published: January 28, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या