पोलिसांच्या जाचाला कंटाळून सोनाराने घेतले विष!

पोलिसांच्या जाचाला कंटाळून सोनाराने घेतले विष!

  • Share this:

शिर्डी, 1 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सोनाराने विष प्राशन करून आपले जिवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. वारंवार पोलीस चोरीच्या गुन्ह्यातील सोने खरेदी केल्याचा आरोप करत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सोनाराची प्रकृती गंभीर असून, त्याला श्रीरामपूरच्या कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर येथील सोन्या चांदीचे व्यापारी गोरख मंडलिक यांच्या 'अंबिका ज्वलर्स' या दुकानात आज संगमनेर येथील पोलीस येवून धडकले आणी तूम्ही चोरीचे सोने घेतलेय असा आरोप केला. पोलिसांकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुवर्णकार गोरख मंडलिक यांनी बुधवारी सकाळी पोलिसांसमक्ष विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष मनोज चिंतामणी यांनी मंडलिक यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांच्या डोळ्यात देखील विष गेले.

दरम्यान, विष प्राशन केल्यानंतर नागरिकांनी त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रणांनी दिलीय. या घटनेचे पडसाद उमटले असून, शहरातील व्यापाऱ्यांनी आज स्वर्णपेठ बंद ठेवली आहे. व्यापाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे समस्या मांडल्या. यावेळी मंडलिक यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित होत्या. पोलीस कायम त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

जर खरच आरोपींकडून सोनाराने चोरीचे सोने घेतले असेल तर त्यास शिक्षा व्हावी मात्र नाहक आपल्या स्वार्थासाठी जर पोलीस अशा प्रकारे एखाद्याला त्रास देत असतील तर अशा पोलीसांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी मंडलीक यांच्या पत्नीने केली आहे.

हेही वाचा..

गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ : ग्राहकांना फटका, गृहकर्ज महागणार

VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका

 

First published: August 1, 2018, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading