भाविकांची जीप 250 फूट दरीत कोसळली, 3 जण जागीच ठार

भाविकांची जीप 250 फूट दरीत कोसळली, 3 जण जागीच ठार

भोजलिंग देवस्थान डोंगरावरून जात असताना भाविकांची जीप दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 3 भविक जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

सातारा, 22 डिसेंबर : साताऱ्यातील माण तालुक्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भोजलिंग देवस्थान डोंगरावरून जात असताना भाविकांची जीप दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इतर नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सांगलीच्या आटपाडीतील विठलामपूर गावातील हे भाविक असल्याचं सांगण्यात येत आहे. तब्बल 200 ते 250 फूट खोल दरीत ही जीप कोसळली आहे.

भोजलिंग देवस्थानी दर्शन घेण्यासाठी आधी पायी वाट होती. तिथून वाहनांना जाण्यासाठी जागा नव्हती. पण डोंगर खूप मोठा असल्यामुळे काही दिवसांआधी वाहनं जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवण्यात आला. दर्शन घेऊन खाली उतरताना चालकाचा ताबा सुटला आणि जीप दरीत कोसळली.

पोलिसांकडून आणि बचावकार्य सध्या सुरू असून जखमींना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत.

VIDEO: अमितच्या लग्नाला मोदींना बोलवणार का? राज ठाकरे म्हणतात...

First published: December 22, 2018, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading