पुलावरून जीप नदीत कोसळून भीषण अपघात, 6 महिलांचा जागीच मृत्यू

पुलावरून जीप नदीत कोसळून भीषण अपघात, 6 महिलांचा जागीच मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावालगत असलेल्या पुलावर जीप थेट 80 फूट खोल नदीत पडली आहे.

  • Share this:

भंडारा, 18 जून : भंडारा जिल्ह्यामध्ये काळ्या पिवळ्या जीपचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुलावरून जात असताना अचानक गाडी खोल नदीत जाऊन कोसळली. यामध्ये पाच ते सहा प्रवासी जखमी असल्याची माहितीही सुत्रांकडून देण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावालगत असलेल्या पुलावर जीप थेट 80 फूट खोल नदीत पडली आहे. गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. जीपमधील प्रवासी साकोली येथून लाखादुर इथं जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.

अपघात झाल्याचं पाहताच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलीस आता अपघाताचा तपास करत आहे.

पुलावरून जीप थेट खाली पडल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. या अपघातामध्ये 5 मुली आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 5 ते 6 जण या अपघातामध्ये जखमी झाले आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

VIDEO : हा घ्या अर्थसंकल्प फुटल्याचा पुरावा, अजित पवारांनी केली पोलखोल

First published: June 18, 2019, 5:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading