...मग पक्षात राहायचं कशाला? भाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांचा घणाघात VIDEO

...मग पक्षात राहायचं कशाला? भाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांचा घणाघात VIDEO

गायकवाड यांनी उघडपणे भाजपमध्ये बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

  • Share this:

बीड, 17 नोव्हेंबर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून (graduate and teacher legislative council elections) भाजपमध्ये (BJP) बंडखोरी उफाळून आली आहे. बीडमधील भाजपचे नेते आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड (jaysingh gaikwad)  यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत असताना गायकवाड यांनी भाजपवर सडकून टीका केला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाकडून जयसिंग गायकवाड इच्छुक होते. पण, उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंग गायकवाड कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

'पक्षात माझ्याकडे काहीच जबाबदारी नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. मी पक्षाकडे वारंवार काही तरी काम मागितले, पण कुणीची प्रतिसाद दिला नाही. माझ्याकडे कुणीच लक्ष देत नसेल तर तिथं कशाला राहायचं अस सवाल  जयसिंगराव गायकवाड यांनी केला.

तसंच, 'पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचेही जयसिंगराव यांनी जाहीर करून टाकलं.

जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडचे खासदार तसेच पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहे. गायकवाड यांनी उघडपणे भाजपमध्ये बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित समजला जात आहे.

औरंगाबादमध्येही भाजपमध्ये बंडखोरी

विशेष म्हणजे, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं.

भाजपनं शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना प्रवीण घुगे व रमेश पोकळे यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपमध्ये बंडाळीचा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना फायदा होऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळेल.

Published by: sachin Salve
First published: November 17, 2020, 3:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading