Home /News /maharashtra /

जयकुमार रावलांच्या कंपनीनं तोरणमाळचा रिसॉर्ट हडप केला, मलिक यांचा आरोप

जयकुमार रावलांच्या कंपनीनं तोरणमाळचा रिसॉर्ट हडप केला, मलिक यांचा आरोप

ज्या कंपनीला रिसाॅर्ट सोडण्याचे आदेश दिले होते. त्या कंपनीच्या संचालकपदी जयकुमार रावल होते

07 फेब्रुवारी : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कंपनीनं तोरणमाळचा रिसॉर्ट हडप केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जयकुमार रावल यांच्या हल्लाबोल केला.  महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी एमटीडीसीचा तोरणमाळ रिसॉर्ट बेकायदेशीर हडपलाय. तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भाडेतत्वावर MTDC कडून रिसॉर्ट चालवायला घेतले होते. मात्र भाडं न देता उलट रिसॉर्टवर 60 लाख रुपये खर्च करण्यात आले.  2006 साली सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याने ताबा सोडण्याचे आदेश देऊनही या रिसॉर्टचा ताबा सोडण्यात आला नाही. ज्या कंपनीला रिसाॅर्ट सोडण्याचे आदेश दिले होते. त्या कंपनीच्या संचालकपदी जयकुमार रावल होते असा आरोप मलिक यांनी केला. तसंच कोर्टाने संबंधित कंपनीला भाडे भरून ताबा सोडण्याचे आदेश दिले होते असा दावाही मलिक यांनी केला. आता पर्यटन मंत्री म्हणून पदाचा दुरुपयोग करून आजही अवैधरित्या रिसॉर्ट सुरू ठेवल्याय असा आरोपही मलिक यांनी केला. संबंधीत कंपनी खोका कंपनी म्हणून ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहे. तरीही या कंपनीमार्फत तोरणमाळ रिसॉर्टही बुकिंग सुरू असल्याचे पुरावे मलिक यांनी दिले. या प्रकरणाचा तपास करून जयकुमार रावल यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. काय आहेत पर्यटनमंत्र्यांवर आरोप ? तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीवर जयकुमार रावल हे संचालक रावल यांच्या कंपनीनं MTDCचं रिसॉर्ट भाड्यानं घेतलं रावल यांच्या कंपनीनं MTDCला भाडंही दिलं नाही गेल्या 13 वर्षांपासून तोरणमाळच्या रिसॉर्टवर कब्जा कोर्टानं आदेश देऊनही रिसॉर्टचा ताबा सोडलेला नाही विरोधकांकडून होत असलेले आरोप तथ्यहीन दरम्यान, नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पुर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती, सांगण्यावरुन माझ्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत.तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही असा खुलासा रावल यांनी केला.
First published:

Tags: नवाब मलिक, राष्ट्रवादी

पुढील बातम्या