19 सप्टेंबर: जायकवाडी धरण तब्बल 10 वर्षांनंतर 88 टक्के भरलं असून धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाने करुन ठेवली आहे.यामुळे यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
आज 5 हजार क्यूसेक्सने पाणी जायकवाडी धरणात दाखल होतं आहे. धरण मोठ्या क्षमतेने 11 वर्ष नंतर भरलं आहे. येत्या 48 तासात एकदा जरी जोरदार पाऊस झाला तर धरणातून पाणी सोडावं लागेल. धरणाखालील बंधाऱ्यांची दारं आधीच काढून ठेवलेली आहेत. आता पाटबंधारे विभाग येणाऱ्या पाण्यावर चोवीस तास नजर ठेवून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jayakwadi, Marathwada