राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत करणार प्रवेश

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते.

  • Share this:

मुंबई, 22 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ते मातोश्रीवर शिवबंधन बांधतील. जयदत्त क्षिरसागर यांचा शिवसेना प्रवेश हा बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. यातूनच लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. पण आपण नक्की शिवसेनेत की भाजपमध्ये प्रवेश करणार, हे क्षीरसागर यांनी स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला होता. आता अखेर ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

धनंजय मुंडेंवर नाराजी

जयदत्त क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्तांची बैठक बोलावली होती. या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्षनेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला होता.

'ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतलं जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थकांनी केला होता.

शिवसेना प्रवेशाच्या हालचाली

राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर एप्रिलमध्ये क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. 'भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,' असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष यांची महत्वाची बैठकही पार पडली होती.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading