बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, जयदत्त क्षीरसागर 'मातोश्रीवर'

राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप आला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 08:03 AM IST

बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का, जयदत्त क्षीरसागर 'मातोश्रीवर'

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 07 एप्रिल: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या बैठकीत क्षीरसागर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे आमदार  क्षीरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप आला आहे. बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथा पालथ होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप'

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्तांची बैठक बोलवली होती. यामध्ये ते आपल्या राजकीय वाटचालीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Loading...

या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. 'मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात येत होता.

'ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतलं जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जाहीर भाषणात क्षीरसागर समर्थकांनी केला होता.

बीड : राष्ट्रवादी की प्रीतम मुंडे?

राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली होती. 'भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,' असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातो.

जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली होती. याच बैठकीतून आमदार क्षीरसागर यांनी आपला लढा कुणाविरुद्ध आहे, यबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं. 'लढा...गुंडगिरी विरोधात, घरफोड्यांविरोधात आणि जातीयवाद्यांविरोधात,' अशी वाक्ये क्षीरसागर यांच्या बैठकीच्या स्टेजवरील बॅनरवर लिहिण्यात आली होती.

कोणत्या पक्षात जाणार?

जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली असली तरीही आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याचा निर्णय 18 एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात त्यांनी गुढीपाडव्याला उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.


मोकाट वळूने रस्त्यावरच उचलून फेकल्याने नागरिकाचा मृत्यू, भयानक VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 07:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...