मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाना पटोले यांच्या नाराजीवर जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले..

नाना पटोले यांच्या नाराजीवर जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले..

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मित्र पक्षांवर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मित्र पक्षांवर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मित्र पक्षांवर टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

  अहमदनगर, 12 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकार (mva government) सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवरुन काँग्रेसने उघड नाराज व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरुन मित्र पक्षांवर टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील निंभेरे येथे निळवंडे कालव्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे (टनेल) उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील परिस्थितीला भाजप जबादार : जयंत पाटील महाराष्ट्रात जी उलथापालथ झाली त्यात भाजपाचा पुढाकार असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. पण, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मत तयार झालं आहे. त्याचा परिणाम नुकताच एका मीडियाने केलेल्या सर्व्हेत दिसून आला आहे. जे सरकार आता स्थापन झालं आहे, त्या विरोधात जनतेचा सूर असल्याचे दिसत असल्याचे पाटील म्हणाले. ..आता निर्णय झालाय : पाटील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची संख्या पाहता सेनेकडे जास्त बळ होत म्हणून विधानपरिषदेत सेनेचा विरोधीपक्षनेता नेमण्यात आला आहे. याबाबत चर्चा व्हावी असं काँग्रेसच मत होतं. त्यांचंही चुकीचे नव्हते. मात्र, आता निर्णय झाला झाला. यापुढे महाविकासआघाडी दोन्ही सभागृहात संघटीत काम करेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

  महाविकास आघाडीत होणार मोठा वाद? कोणी नाराज तर कोणी आक्रमक, नेमकं चाललंय काय?

  ओढून ताणून सरकार.. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर विचारले असता पाटील म्हणाले, की हे सरकार ओढून ताणून स्थापन झालं आहे. कोणालाच अपेक्षा नव्हती असं सरकार निर्माण झालंय. फडणविसांचं सरकार नसताना जास्त सुखात असतील . सरकार आल्यावर ओढून-ताणून नाराजी अंगावर घेतल्यासारखं झालंय, अशी प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी नाट्यावर दिली. आता अजून वाट पाहा.. मंत्रीमंडळाची वाट बघत महाराष्ट्र 40 दिवस थांबला. आता खातेवाटपाची वाट बघत 8 ते 15 दिवस थांबलं तर काय बिघडणार आहे, अस त्यांना वाटत असेल असा खोचक टोला जयंत पाटील यांनी शेवटी लगावला. काय म्हणाले होते नाना पटोले? मैत्री असेल तर सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजे. आपल्या मताने गोष्टी करायच्या तर त्याला मैत्री म्हणत नाही. 'पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. आमची काही नैसर्गिक युती नाही, चर्चा करून निर्णय घ्यायला हवा आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. पण हे साधं बोलायला विचारायला तयार नाही, अशी टीकाही पटोलेंनी सेनेवर केली.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Jayant patil, Nana Patole

  पुढील बातम्या