Home /News /maharashtra /

Ncp Jayant Patil : विरोधी बाकावर बसण्याबाबत जयंत पाटील यांनी केले सूचक वक्तव्य

Ncp Jayant Patil : विरोधी बाकावर बसण्याबाबत जयंत पाटील यांनी केले सूचक वक्तव्य

आमची शरद पवार (ncp leader sharad pawar) यांच्यासोबत बैठक झाली त्यामध्ये तीन दिवसात घडलेल्या घटनेवर चर्चा झाली. यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत (shiv sena) राहणार आहे.

  मुंबई, 23 जून : आमची शरद पवार (ncp leader sharad pawar) यांच्यासोबत बैठक झाली त्यामध्ये तीन दिवसात घडलेल्या घटनेवर चर्चा झाली.  यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत (shiv sena) राहणार आहे. शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबत ठाम उभे असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (ncp president jayant patil) पत्रकारांसमोर दिला. याचबरोबर सरकार पडल्यास विरोधी बाकावर बसण्यासाठी तयारी करावी लागत नाही सरकार पडल्यास विरोधी बाकावर नक्कीच जावे लागेल असेही जयंत पाटील म्हणाले. (Ncp Jayant Patil)

  दरम्यान काल आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतली यामध्ये सर्वजण एकत्र राहण्याचे ठरले आहे. जे आमदार गेले आहेत ते पुन्हा शिवसेनेत येतील. शिवसेना एकसंध राहण्यासाठी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान मुंबईतील जे आमदार गेले ते आमच्यासाठी अनपेक्षित आहे.

  हे ही वाचा : 'जे सोडून गेले ती शिवसेना नाही, काल रात्री रस्त्यावर जे होते ती खरी शिवसेना': संजय राऊत

  ते पुढे म्हणाले की, जे आमदार बंडखोरी करून गेले आहेत ते आमदार उद्धव ठाकरे यांच्यासमोर आल्यावर पुन्हा त्यांच्यासोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री यांनी राजीनामा देणार हे त्यांचे वक्तव्य आहे. यानंतर त्यांनी कोणतेही वेगळे वक्तव्य केले नाही. पाटील यांनी मुख्यमंत्री वर्षा बंगला सोडण्यावर ही भाष्य केले ते म्हणाल की, मुख्यमंत्र्यांना आम्हीच वर्षा बंगल्यावर येण्याचा आग्रह केला होता त्यांना मातोश्री सोडायचे नव्हते ते पुन्हा तिथे गेले आहेत यावर कोणतेही राजकारण नाही.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री मंत्रालयाला देणार निरोप? दुपारी सर्व सचिवांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक

  ख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादानंतरही आज सकाळी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल जोरदार शक्तीप्रदर्शन करत वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये आले.

  एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात, त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता मंत्रालयातील सगळ्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. अडीच वर्ष केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री आभार व्यक्त करणार आहेत. ही मंत्रालय अंतर्गत बैठक असल्यामुळे याचं प्रक्षेपण करता येणार नाही.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Jayant patil, Sharad Pawar (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या